भव्य रोजगार मेळावाअहवाल
भव्य रोजगार मेळावा हा कार्यक्रम रविवार, दिनांक०८/०२/२०२६रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि विविध क्षेत्रातील नोकरी विषयक मार्गदर्शन करणेया उद्देशाने करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटक मा. श्री. निरंजनजी डावखरे, आमदार, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनीआपल्या भाषणात युवकांना कौशल्यविकास, शिक्षण आणि योग्य मार्ग दर्शनयांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी युवकांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांनी ही युवकांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. विविध कंपन्या व संस्थांनी या मेळाव्यात सहभाग घेतला होता. त्यांनी उमेदवारांची नोंदणी करून मुलाखती घेतल्या आणि योग्य उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरूकेली.
या मेळाव्यात मोठ्या संख्येने युवक- युवती सहभागी झाले. त्यांना विविध नोकरीच्या संधी, मार्गदर्शन व माहिती मिळाली. अनेक उमेदवारांची प्राथमिक निवडही करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्यरीत्या पार पडले. उपस्थित मान्यवर, आयोजक आणि सहभागी युवकांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे रोजगार मेळावे युवकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत सर्वांनी व्यक्त केले.
निष्कर्ष:
सत्य रोजगार मेळावा हा युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा व मार्गदर्शन करणारा उपयुक्त उपक्रम ठरला. भविष्यात ही अशा प्रकारचे कार्यक्रमआयोजित केल्यास युवकांच्या करिअर विकासाला निश्चितच चालना मिळेल.